Posts

Image
भोर गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलेले एक निसर्गरम्य गाव आहे, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आणि असंख्य मावळ्यांची जन्मभूमी असलेले महाराष्ट्रातील खूप सुंदर ठिकाण आहे. भोर परिसरात अनेक गड, किल्ले, धरण, विरघळी ई. आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने रोहिडेश्वर, राजगड, रायरेश्वर, तोरणा ई. प्रमुख किल्ले आहेत आणि स्वयंचलित भाटघर आणि नीरा देवघर ही दोन धरणे आहेत. भोर येथील प्रसिध्द राजवाडा ही एक ऐतेहासिक इमारत अजूनही दनदाकट परिस्तिथीत आहे. भोर हे ऐतेहासिक ठिकाण असून, फक्त पर्याटनासाठीच प्रसिध्द नसून चित्रपट श्रुस्टीस मोह पाडण्यासारखे आहे. भोर मतदारसंघाचा अनेक वर्ष विकास काम करण्यासाठी महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री माननीय श्री. अनंतरावजी थोपटे सदैव प्रयत्नशील आहेत. त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी भोर येथे राजगड ज्ञानपीठ ही शिक्षण संस्था उभारून त्यांच्या भविष्यासाठी खूप मोठे योगदान दिलेले आहे, व आजरोजी भोर - वेल्हा - मुळशी या मतदारसंघातून त्यांचे चिरंजीव माननीय आमदार श्री. संग्रामदादा  थोपटे हे भोर व परिसराचे ऐतेहासिक मौल्य जपण्यासाठी जातीने लक्ष घालत आहेत.